श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त छायाचित्र स्पर्धा

on Tuesday, 5 July 2011



शिवसेना नेते श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आ. श्री. महादेव बाबर आणि मेनका प्रकाशन यांनी राज्यस्तरिय छायाचित्र स्पर्धेचं आयोजन केलं आहे. ही स्पर्धा हौशी आणि व्यावसायिक अशा दोन गटांमध्ये घेतली जाईल. स्पर्धेसाठी विषय आहेत -

१. भक्ती
२. विसंगती
३. स्कूल चलें हम

आपल्या प्रवेशिका २३ जुलै, २०११पर्यंत photocontestpune@gmail.com या ईमेल पत्त्यावर किंवा मेनका प्रकाशन, २११७, सदाशिव पेठ, विजयानगर कॊलनी, पुणे - ३०, या पत्त्यावर पाठवाव्यात.

हौशी आणि व्यावसायिक अशा दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी तीन रोख रकमेची बक्षिसं देण्यात येतील. तसंच स्पर्धेसाठी आलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन ३० - ३१ जुलै, २०११ रोजी बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित केलं आहे. ३१ तारखेला बालगंधर्व रंगमंदिरातील समारंभात श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पारितोषिकं दिली जातील.

अधिक माहितीसाठी (०२०) २४३३६९६० किंवा ९८२३१ ६४२८४ या क्रमांकांवर आपण संपर्क साधू शकता.

0 comments:

Post a Comment